आपण पोटाची चरबी कमी करण्यासाठी भरपूर व्यायाम करतो परंतु आपल्याला पाहिजे तेवढा परिणाम दिसत नाही परंतु जर मी इथे असे म्हटले कि कमी कष्ट करून सुद्धा तुम्ही तुमच्या पोटावरील चरबी कमी करू शकता तर आश्चर्य वाटू देऊ नका. कारण नियमित काही योगासने करून आपण हे सहज करू शकतो. शरीरातील चरबी करण्या बरोबर या आसनाचे इतरही भरपूर फायदे आपल्या शरीराला होतात, त्याबद्दल आपण खाली सविस्तर जाणून घेऊयात.
हे आसन एकपाद उत्तानासनाप्रमाणेच आहे फक्त या आसनामध्ये दोन्ही पाय वर उचलायचे आहेत. शरीरातील स्थूलपणा कमी करण्यासाठी हि दोन आसने फार उपयोगी आहेत.
कृती: (Uttanpadasana Steps)
- पाठीवर सरळ झोपा.
- दोन्ही हात आपल्या शरीराला समांतर ठेवा.
- दोन्ही पायांच्या टाचा जोडून पाय सरळ ठेवा.
- हळूहळू श्वास घेत राहा.
- आता पाय हळूहळू वर आकाशाकडे उचला.
- काही सेकंद ह्याच स्तिथीत राहा, या स्तिथीत श्वास रोखून धारा.
- दोन्ही पाय हळूहळू खाली आना.
- आता रोखलेला श्वास हळू हळू सोडा.
थोडा वेळ आराम करा आणि पुन्हा हीच क्रिया परत करा. सुरुवातीला हे आसन दिवसातून चार वेळा करावे, सरावानंतर पाच ते सहा वेळा करावे.
फायदे:(Benefits of Uttanpadasana)
- या आसनाच्या नियमित सरावामुळे पचनशक्ती सुधारते.
- या आसनामुळे स्वादुपिंड(pancreas) कार्यक्षम बनते, त्याचाच परिणाम म्हणून बद्धकोष्टता व अपचनासारख्या तक्रारी दूर होतात.
- या आसनामुळे पाठीचा मणका (spinal cord) सुदृढ बनतो.
- या आसनाच्या नियमित सरावामुळे स्नायू मजबूत बनतात.
- उचकी लागणे, जांघेत दुखणे, वारंवार ढेकर येणे, वारंवार शौचास येणे व अपानवायू (fart) चे विकार या आसनाच्या सरावाने दूर होतात.
- मूळव्याधीची सुरुवात असेल तर या आसनाच्या सरावामुळे ती व्याधी दूर होण्यास मदत होते.
- या आसनामुळे शरीरातील चरबी कमी होते.
Comments
Post a Comment
आपल्या सुचनांचे स्वागत आहे.
भेट दिल्या बद्दल धन्यवाद. 🙏